शिक्षणाचे खाजगिकरण देशाला विनाशाकडे नेणार – जयसिंग वाघ

0
41

जळगाव – सरकार शिक्षण या पायाभूत मूल्याचे खाजगिकरण करत आहे , शिक्षणाचा दर्जा कमी कमी करत आहे, बजेटमध्ये शिक्षणावर योग्य योजना आखत नाही सरकारचे हे धोरण देशाला विनाशाकड नेणारे असून तमाम बहुजन समाजास शिक्षणा पासून वंचित ठेवणारे आहे. असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

शिक्षण बचाव जन आंदोलन समिति तर्फे जिल्हाधिकारी जळगाव कार्यालया समोर ५ ऑक्टोबर रोजी आयोजित धरणे आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते. संयोजक मुकुंद सपकाळे यांनी शासन आज ६२००० शासकीय शाळा खाजगी करु पाहत आहे, शासनाचे हे धोरण आम्ही कदापी यशस्वी होवू देणार नाही असे सांगितले. डॉ. करीम सालार यांनी शासनाच्या एकूणच शैक्षणिक धोरानावर जोरदार हल्ला केला व सरकारी शाळा पूर्ववत सुरु ठेवा असा सल्ला दिला. प्रा. एस. एस. राणे, प्रा. दिलीप भारंबे, शिवराम पाटील, राजकिशोर गुप्ता, प्रा. व्ही. डी. पाटील, सुमित्र अहिरे, सलीम खान आदिनी आपले मनोगत व्यक्त केले.

या धरणे आंदोलनात शासन विरोधी घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या. शासनाने हा निर्णय मागं घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा निर्धार करण्यात आला. १२५ पेक्षा अधिक प्राध्यापक, शिक्षक, संस्थाचालक, विद्यार्थी, कार्यकर्ते हजर होते . दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले व या प्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली. धरणे आंदोलन यशस्वीते करिता विविध संघटना कार्यरत होत्या.

Spread the love