परिवर्तन महाशक्तीचे नेते छत्रपती संभाजी राजे !
दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये
अमळनेर – : विधानसभा मतदार प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप किरण पाटील यांचा अर्ज काहि त्रुटीमुळे फेटाळला गेला होता. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी मा शिरीष चौधरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.संघातील अपक्ष उमेदवार मा.शिरीषदादा चौधरी यांना यावेळी बहुसंखेने निवडून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अमळनेर तालुक्यातील किमान पाच हजार चारशे तर पारोळा तालुक्यातील सहाशे अपंग (दिव्यांग) बंधू भगिनींनी बहुसंखेने पाठींबा दिला असल्याचे पत्र डॉ. रविंद्र चौधरी यांचेकडेस सुपूर्द केले आहे. पुन्हा एकदा मा.शिरीषदादा चौधरी यांना अमळनेर विधानसभा निवडणूकीत विजयी करण्याचा संकल्प केला असल्याचे वृत्त प्रहार संघटना अमळनेर शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष अपंग तालुका अध्यक्ष व युवक तालुकाध्यक्ष यांनी दिले आहे. मा.शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील दिव्यांग एकवटला आहे. मतदार संघातील अपंगाच्या अडी-अडचणी, व्यथा, योजना व अपंगांचा सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यासाठी व अपंगाचे, शेतकरी युवक विद्यार्थ्यांचे पश्न सोडविण्यासाठी तसेच अपंगांच्या दिव्यांग शेतमजूरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे लोकनेते बच्चूभाऊ कडू आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे व परिवर्तन महाशक्तीचे शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष प्रदीप बोरसे व अपंगा तालुकाध्यक्ष योगेश पवार व रवींद्र पाटील (तालुका प्रमुख), प्रमोद पाटील, प्रदीप गोसावी, शिवाजी पाटील, विपुल पाटील, आणि राजेंद्र माधवराव पाटील शिवाजी साहेबराव पाटील, अशोक ठाकरे, साहेबराव महाजन, हमीद खाटीक यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.