शिरसाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा विकासाच्या मुद्यावरून गाजली ! 

0
46

दिपक नेवे

शिरसाड ता.यावल येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा गावाच्या विकासाच्या व ग्रा.पं.च्या भ्रष्टकारभाराच्या चांगलीच गाजली. गावाच्या विकासाच्या व भ्रष्टकारभाराच्या मुद्यावरून गावाच्या ३० वर्षाच्या इतिहासात प्रथमच ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ आली होती .  प्रशासनाच्या निर्देशानुसार दि.३० रोजी सदर शिरसाड ग्रा.पं.ची ग्रामसभा योजिली होती.दरम्यान सभा सुरू झाल्या पासून ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रविण( गोटू) सोनवणे तसेच माजी उपसरपंच धनंजय एकनाथ पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य तेजस धनंजय पाटील यांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरून १४ व्या वित्तआयोगाचे २५ लाख रुपये खर्च करून खोटे बिले टाकल्यामुळे गावाचा पाहिजे तो खर्चाच्या तुलनेत विकास झाला नाही या मुद्यावरून ग्रामसभा खूप गाजली. सभेला सरपंच दिपक इंगळे, उपसरपंच राजेंद्र सोनवणे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. परंतु ग्रा.पं.कडून झालेल्या खर्चाच्या संदर्भात कुठल्या ही प्रकारचे उत्तर ग्रा.पं.प्रशासनास देता आले नाही. व कुठल्यही कामकाजाचे दप्तर सभेत दाखवले नाही. त्या वरून सभा तहकूब करण्यात आली.

सभेला ग्रामस्थ महिला व पुरुष आणि तरुण वर्ग तसेच ग्रामसेवक दिपक तायडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्याच प्रमाणे गावातील वार्ड क्र.४ मध्ये खूप मोठया प्रमाणात चिखल झाल्यामुळे धनंजय एकनाथ पाटील यांनी ग्रामपंचायतीला वार्ड क्र.४ मध्ये रेती टाकण्यासाठी १०००० रु.च्या पावत्या फाडून मदत म्हणून दिले.

Spread the love