प्रतिनिधी दिपक नेवे
यावल – दोन वर्षापासून कोरोना महामारीने सर्व जग त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या जागतिक संकटात कुटुंब व स्वतः पेक्षाही लोकांचे जीव वाचवण्यास प्राध्यान्य देणाऱ्या माणसातील देव समजल्या जाणाऱ्या कोरोना योध्दांचा शितल अकॅडमी(यावल) यांच्यातर्फे दि.१३ रोजी डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे सध्या गणेशोत्सवाचे पर्व सुरू असल्याने या उत्सवाचे औचित्य साधून सदर सत्कार समारंभ योजिला होता याप्रसंगी सर्व सत्कारार्थी कोरोना योध्दांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमाला
डॉ. धनश्री बडगुजर, डॉ. ए. वि. पाटील, डॉ. आर. आर. ठाकूर, डॉ. सुनील निकम,डॉ. निलीमा धाकड, डॉ. लोकेश पटवरी, यशवंत इंगळे, आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.शितल अकॅडमीच्या वतीने दुर्गा मॅडम यांनी सत्कार केले.
स्वतः जीव धोक्यात घालून आपल्या रूग्णाला कोरोना आजारा पासून वाचवण्यासाठी घरा बाहेर पडलेल्या या सर्व कोरोना योध्दांचा सत्कार कार्यक्रम अतिशय भावस्पर्शी झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील सर यांनी केले.












