वीरेंद्र मंडोरा प्रतिनिधी जळगाव संदेश :
जळगाव-: दिनांक 4 ऑक्टोबर आज दसऱ्याच्या पूर्व संध्याला बाजार बहरला होता कपडे खरेदी फुलं व इतर वस्तूंच्या खरेदी करता खेड्यापाड्यावरून व आजूबाजूच्या परिसराततून हजारो नागरिक शहरात आलेले होते.

व अशा शहरात येण्याचा व जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिवाजीनगर चा उड्डाण पूल व ह्या पुलावरच नेमका संध्याकाळच्या वेळेला पथदिवे व खांब उभारण्यासाठी मोठे क्रेन व जेसीबी यांचे काम चालू होते. व त्याच वेळी दोन चार चाकी वाहनधारकांनी आपले वाहन बेशिस्त पुलाच्या तोंडावरच लावून खरेदीसाठी मार्केटला गेले त्यामुळे येणारे व जाणारे वाहन अटकून पडले. त्यामुळे जवळजवळ चार-पाचशे वाहन टावर चौक पासून शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पर्यंत अडकून पडले होते. सुमारे एक ते दीड तास वाहने कोळंबलेली होती त्यामध्ये एसटी ,डंपर, बैलगाड्या रिक्षा यांच्यात पुढे जाण्यावरून चढाओढ निर्माण झाली व इथेच रस्ता जाम झाला. एकच वाहतूक पोलीस कर्मचारी असल्यामुळे वाहतूक सैरावैर झाली व वाहनधारक लोक अडकून पडले.टॉवर चौक हा गर्दीचा परिसर असल्याने येथे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी देखील वाहनधारकांकडून केली जात आहे.










