दिपक नेवे
यावल – औद्योगिक प्रशिक्षण, तसेच खासगी क्लासेस चालू झालेले असून शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून दररोज शेकडो मुलं येत असतात.बस सेवा बंद असल्याने त्यांना तासोतस उभे राहून रोज कित्येक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत असतो,त्यामुळे आज शिवशंभु संघटनेच्या युवती तालुका अध्यक्षा कुमारी कविता ज्ञानेश्वर पाटील व विद्यार्थ्यांच्या मदतीने यावल बस आगार व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव साहेबांना बस सुरू करण्याबाबत चे निवेदन देण्यात आले,त्यांनी संघटनेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना समजून लवकरचं बस सुरू करू असे आश्वासन दिले.
निवेदन देते वेळी शिवशंभु संघटनेच्या युवती तालुका अध्यक्षा कुमारी कविता पाटील,ममता सुतार,निलेश विचवे,तेजस महाजन,दिव्या पाटील, निलम महाजन,कोयल जावळे, खुशी महाजन,गौरव पाटील,कुशल पाटील,सुमित पाटील,कल्पेश पाटील,निखिल सुतार आदी उपस्थित होते….