शेतात काम करत असताना शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

0
38

जळगाव – कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या घुसर्डी (ता.पाचोरा) येथे केळी लागवडीसाठी पावटी पाडत असतांना विजेचा धक्का बसला. यामुळे तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथील तरुण शेतकरी विकास धर्मा निकुंभ (वय २३) हे काका राजेंद्र निकुंभ आणि चुलत भाऊ साई व यश निकुंभ यांच्यासमवेत शेतात केळी लागवडीसाठी पावटी पाडण्याचे काम करत होते. या दरम्यान पावट्या सरळ पडाव्या यासाठी तारेने ते आखणी करत होते. पावटी पाडण्यासाठी असलेला तार वापरण्यात आला, तो तुटल्यामुळे सदर तार शेतातून गेलेल्या ११ केव्ही या गावठाणच्या लाईनवर गेला. यामुळे त्यात विद्युत करंट उतरल्याने विकास निकुंभ यास विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा धक्का बसल्याने विकास शेताच्या बांधावर जाऊन बेशुद्ध पडले. सदर प्रकार काका व चुलतभाऊना लक्षात येताच त्यांनी विकासला तात्काळ कजगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. सदर घटना गावात कळताच रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. विकासच्या पश्च्यात आई- वडील, दोन भाऊ असा परीवार आहे.

Spread the love