पारोळा – तालुक्यातील एका गावात ६५ वर्षीय आई समोर ३५ वर्षीय मुलाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत आईचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटना पारोळा तालुक्यातील एका गावात दिनांक १३ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. यावेळी आईने आरडा ओरड केली असता मुलाने शिवीगाळ करीत आईलाच जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारोळा पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.












