धक्कादायक !! नवरा पसंत नाही म्हणून पुतण्यासोबत फरार झाली, तिच्यावरच दाखल झाली अपहरणाची तक्रार

0
44

नवरा पसंत नाही म्हणून एक अल्पवयीन मुलगी तिच्या पुतण्यासोबत फरार झाली आहे. तिचा नवरा 45 वर्षांचा आहे आणि तिचं वय 16 वर्षं आहे. सासरच्या मंडळींनी तिच्याच विरोधात अपहरणाची तक्रार नोंदवली आहे.

राजस्थान येथील धौलपूर येथे ही घटना घडली आहे. ही मुलगी मूळची मध्य प्रदेशची आहे. दोन वर्षांपूर्वी तिचं लग्न धौलपूर जिल्ह्यातील या माणसाशी करून दिलं होतं. पण तिचा नवरा वयाने मोठा असल्याने तिला ते लग्न पसंत नव्हतं. या लग्नापासून तिला एक मुलगी झाली. पण, सासरी राहत असताना तिला तिच्या मोठ्या दिराचा 22 वर्षांचा तरुण मुलगा आवडला.

त्याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने ती ऑक्टोबरमध्ये एक दिवस त्याच्यासह घरातून पळून गेली. तिच्या नवऱ्याने आधी ती गायब झाल्याची तक्रार दाखल केली. ती सतत नवनवीन फोननंबरवरून संपर्क साधत होती. मात्र, पोलिसांच्या हाती लागत नव्हती.

अखेर ती तिच्या पुतण्यासोबत पळून गेल्याचं कळताच तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्याच विरोधात या तरुणाचं अपहरण केल्याची तक्रार केली आहे. सध्या पोलिसांकरवी तिचं समुपदेशन सुरू आहे. तिच्या माहेरच्या मंडळींनाही पाचारण करण्यात आलं आहे.

Spread the love