सध्या सोशल मिडीयावर रील आणि व्हिडीओची क्रेझ आहे. या रीलच्या वेडापायी स्टंट करताना अनेकांचा जीव गेला आहे. तरीही रील बनवून प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. याचा प्रत्यय झाशीत आला आहे. रील बनवण्यासाठी एका यूट्यूबरने वृद्धाच्या चेहऱ्यावर फॉग स्प्रे मारला आणि त्याचा रील बनवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने रील बनवणाऱ्या यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर रीलद्वारे पैसे कमवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ बनवत असतात. मात्र आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होईल याचा विचारही करत नाहीत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. झाशीतील एका YouTuber ने रील बनवण्यासाठी धक्कादायक घटना केली आहे.
यूट्यूबरने सायकलने जाणाऱ्या वृद्धाच्या तोंडावर फॉग स्पे मारला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाशी पोलिसांनी यूट्यूबरवर कारवाई केली आहे. हा व्हिडीओ सिपरी बाजारच्या ओव्हरब्रिजजवळचा आहे. या व्हिडीओतील आरोपी त्याच्या 3 मित्रांसह दुचाकीवरून जात आहे. यातील एक तरुण बाईक चालवत आहे, दुसरा व्हिडीओ बनवत आहे आणि मागे बसलेला एक तरुण हातात स्प्रे धरून आहे. यावेळी त्यांच्या बाजून सायकल वरून जाण्याऱ्या एका वृद्धाची या तरूणांनी छेड काढली आहे. दुचाकीवरूल एका तरूणाने त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर फॉग स्पे मारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
https://x.com/jhansipolice/status/1837844074507690207?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1837844074507690207%7Ctwgr%5E3baf870d82b573519b2cb8387be29e3f77d4170c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fappyet_base%2F
झाशीच्या व्हायरल व्हिडीओवर देशभरातून संताप व्यक्त केला गेला. त्यामुळे झाशी पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून आरोपीला ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने इन्स्टाग्रामवरून व्हिडिओ डिलीट केला. तसेच त्याने सोशल मीडियाचा गैरवापर न करण्याचा सल्लाही दिला आहे. ‘माझ्या वाईट कृत्यांची शिक्षा मला मिळाली आहे. सर्वाना विनंती आहे की मी ज्या प्रकारचे काम सोशल मीडियावर केले आहे. तसे काम कोणी करू नये. ही विनंती असे तो यावेळी म्हणाला.