धक्कादायक !!अल्पवयीन विद्यार्थीनीचा शिक्षकाकडून विनयभंग

0
51

येथील एका शाळेच्या शिक्षकाने त्याच शाळेत शिकणाऱया 11 वर्षाच्या मुलीला दुसरीच्या वर्गात बोलवून तिचा विनयभंग केल्याची घटना दि. 22 रोजी सकाळी 10.30 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे. पोक्सो अंतर्गत त्या शिक्षकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱया गंभिरे नामक शिक्षकास अटक करण्यात आली असून शिक्षकाने केलेल्या कृत्यामुळे तीव्र संताप पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

जिह्यात अगोदरच पाटण येथे अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. अशातच सातारा शहरात एका शाळेतल्या शिक्षक गंभीरे याने 11 वर्षाच्या विद्यार्थीनीला दुसरीच्या वर्गात दि. 22 रोजी सकाळी 10.30 वाजता बोलवून घेतले. दरवाजा बंद केला आणि त्या शिक्षकाने त्या विधार्थीनीशी गैरवर्तन केले. ती विद्यार्थीनी या प्रकाराने चांगलीच घाबरून वर्गातून रडत रडत बाहेर आली. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. पालकांनी लगेच शाळेत धाव घेतली. यामुळे शाळेत वातावरण तणावपूर्ण झाले होते. पालकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

पीडित विद्यार्थीनीच्या वडिलांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गंभिरे या शिक्षकावर पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्या शिक्षकास अटक केली आहे. याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सी. एस. मोटे हे करत आहेत.

Spread the love