दिपक नेवे
यावल -दि. 20.8.2021 .रोजी सिद्धांत राजू घारु यांनी भुसावळ येथून श्री गोगाजी महाराज यांच्या अकरा देव काट्या च्या पूजनाच्या आयोजन केले होते यांचे आगमन श्री तिरुपती बालाजी मंदिर यावल येथे झाले या ठिकाणी यावल व भुसावळ येथील सर्व वाल्मिकी मेहतर समाजाचे बांधव व इतर मित्र मंडळ सर्व उपस्थित होते यादेव काट्यांचे श्री तिरुपती बालाजी मंदिर तर्फे ॲडव्होकेट राजेश गडे यांनी सर्व अकरा देव काट्यांना श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केले तसेच भुसावल यावल वाल्मीकी मेहतर समाजातर्फे ॲडव्होकेट राजेश गडे यांना श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला व सर्व देव काट्या या बालाजी मंदिरापासून सिद्धांत राजू घारू यांच्या निवास्थानी गेल्या त्या ठिकाणी सर्व समाज बांधवाना तर्फे त्या देव काट्यांचे पूजन करण्यात आले पूजन झाल्यानंतर प्रसाद कार्यक्रम संपन्न झाला यानंतर सर्व देव काट्या यांना निरोप देण्यात आला या काठ्या यावल येथून भुसावळ ला रवाना करण्यात आल्या