जळगाव – येथील तळेले काॅलनीत श्री दत्त मंदिराजवळ महिला मंडळाच्या वतीने दि. २३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात कथा वाचक व्यासपीठ हभप सुरेश महाराज तळवेलकर असून त्यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रोत्यांना कथेचा आनंद घेता येतो आहे. कथा सांगता समारंभाच्या दिवशी हभप सुरेश महाराज तळवेलकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून या कथेचा आनंद भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.










