गोजोरे येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहास सुरवात !

0
43

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथे महाशिवरात्री निमित्त वैकुंठवासी गुरुवर्य जगन्नाथ महाराज अंजाळे व वैकुंठवासी हभप कांतीलाल बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने दि.२ ते ९ मार्च या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले असून कथा प्रवक्ते हभप सुरेश महाराज तळवेलकर हे आपल्या सुश्राव्य वाणीतून कथा निरुपण करीत आहेत. या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या कथा वाचन संध्याकाळी श्री हरिपाठ व रात्री ८ ते १० नामसंकीर्तन होत आहे. या सप्ताहात हभप हभप गणेश महाराज गोजोरे, हभप सौ रंजनाताई वारके महाराज बामणोद, चंद्रकांत महाराज साकरी यांची किर्तने झाली असून दि ५ रोजी हभप शरद महाराज गोजोरे, ६ रोजी हभप भास्कर महाराज दाताळा ,७ रोजी हभप श्रीकृष्ण महाराज, ८ रोजी हभप सौ सीमाताई महाराज भुसावळ व दि.९ रोजी दुपारी १२ ते ३ महाप्रसाद आणि संध्याकाळी दिंडी सोहळा, भारुड व रात्री हभप सुरेश महाराज तळवेलकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गोजोरे ग्रामस्थांनी केले आहे.

Spread the love