हेमकांत गायकवाड
चोपडा -रामपुरा चोपडा येथील रहिवासी आहे. रामपुरा भागात १) श्री.सुरेश कडू भिल यांचे घरापासुन ते बळीराम रतन भिल यांचे घरापर्यंत २) श्री.मंगल सिताराम भिल यांचे घरापासुन ते आबा किसन भिल यांचे घरापर्यंत ३) श्री.मच्छिंद्र सुरसिंग भिल यांचे घरापासुन ते माणिक मयाराम भिल यांचे घरापर्यंत
अशा तीन रस्त्यांची काँक्रीटीकरणाचे काम चालू असून सदरची कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाची केली जात आहेत. ठेकेदार यांना वारंवार सूचना देवून देखील तो त्याच्या कामात सुधारणा करण्यास तयार नाही. वाढीव कामात देखील आसारी(स्टील) वापरली गेली नाही.तसेच नगरपरिषदेचे इंजिनिअर अगर कोणतेही कर्मचारी सदर कामाच्या तपासणीबाबत व काम पाहणीस आलेले नाहीत.
तरी सदरची कामे तात्काळ थांबविण्यात यावी व सदर कामांची चौकशी करण्यात येवून संबंधीत ठेकेदारास कोणतीही रक्कम अदा करण्यात येवू नये ही विनंती.