प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे युवा प्रबोधन साहित्यमंच, ग्रामीण युवा बहुद्देशीय संस्था आणि बंडखोर साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुळचे नाडगाव बोदवड येथील दिलीप पालवे यांना राज्य स्तरीय युवा संकल्प महाराष्ट्र आदर्श समाजरत्न भूषण पुरस्कार रविवार दिनांक ५/४/२०२६ रोजी पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय विशाल लोंढे साहेब (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे.) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सर्वप्रथम सुत्र संचालन मावळ तालुक्याचे सुपुत्र प्रबोधनकार सागरभाऊ वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष मा. हरेशभाई देखणे साहेब होते. तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आय डी एल अँड कंपनीचे डायरेक्टर मा. संतोष वाकोडे, प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. दत्ता कोहिनकर (माईंड पॉवर ट्रेनर) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते मा. संपत गारगोटे, कार्यक्रमाचे उद्घाटक पुणे शहर आर. पी. आय अध्यक्ष मा. शैलेंद्र चव्हाण, हे होते. कवी जितेन सोनवणे, साहित्यिका विणा कडू, वृक्षाली वीरगुजर, ज्योतीताई गायकवाड, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद हिवराळे, प्रवक्ता ईश्वर इंगळे, सुरेखाताई पालवे, वैशालीताई बडोदे इत्यादी मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती. त्याच प्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, कला औद्योगिक, मराठी सिने सृष्टीतील कलावंत त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील सर्व पुरस्कारार्थी अनेक पदाधिकारी मान्यवर बंधू-भगिनी सहकुटुंब मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात दिलीप पालवे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माझ्या साठी हा सन्मान खूप महत्त्वाचा प्रेरणादायी आहे. माझ्या वरील जबाबदारी अधिक वाढली असुन अजून खूप काही समाज कामे करण्याचे बळ मिळाले आहे. माझ्या सोबत माझे कुटुंब आणि सर्व समाज बांधव यांचा खूप मोलाचा वाटा आहे, म्हणूनच आजवर मला हा प्रवास शक्य झाला.
हा केवळ माझा एकट्याचा सन्मान नसून, आजवर मला प्रत्येक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात माझे मित्र परिवार यांचे जे सहकार्य लाभले त्या सर्वांचा हा सन्मान आहे, असे म्हणत आयोजकांचे आभार मानले.










