ममुराबाद -: येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२२ – २०२७ ची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत तिन पॅनल निवडणूक लढत आहेत. त्यामुळे तीन स्वतंत्र पॅनेल उभे असल्याने ही निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत शेतकरी पॅनल, शेतकरी विकास पॅनेल व शेतकरी विकास तिसरी आघाडी पॅनेल असून या तीन पॅनेलमुळे ही निवडणूक चुरशीची व रंगतदार होणार आहे.ममुराबाद विविध कार्यकारी सोसायटीच्या एकूण १३ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक लढवत आहे. शुक्रवार ता.१३ रोजी सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. एकूण १३ जागा असून सर्वसाधारण जागेसाठी २२ उमेदवार, अनुसूचित जाती जमाती जागेसाठी २, महिला प्रतिनिधी जागेसाठी ५ उमेदवार, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३ उमेदवार, भटक्या विमुक्त जाती जमाती जागेसाठी ३ उमेदवार असे एकूण ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी दिनांक २२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममुराबाद येथे मतदान होणार असून याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.












