श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा..गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

0
14

चोपडा (प्रतिनिधी):- खान्देशातील भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेले यावल तालुक्यातील शिरागड येथील तापीनदीच्या काठावर शेकडोंवर्षांपुर्वी स्थापित श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरावर जायला रस्ताच नसल्यामुळे देवीभक्तांना खुपच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हि देवी नवसाला पावणारी असून येथे वर्षभर हज्जारों भाविकभक्तं नवस फेडायला, मानता द्यायला, होमहवन पुजन व दर्शन घ्यायला येत असतात. शिरागड व कोळन्हावी ह्या दोन्ही गावांकडून मंदिरावर यायला व जायला कच्चा रस्ता होता, परंतु तो ही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने भाविकभक्तांना तापी नदीतील होडीत बसून आपला जीव मुठित धरूनच देवीचे दर्शनाला जावे लागते. याआधी ह्या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी येथे रस्ता व पूल व्हावा यासाठी शासन प्रशासनाकडे अनेकदा निवेदनही पाठविलेली आहेत. परंतु अजूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे ह्या येथे नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आल्या असता शिरागड येथील ग्रामस्थांतर्फे पुन्हा निवेदन देण्यात आलेले आहे. त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरागड ते कोळन्हावी दरम्यान नविन रस्ता व पुल बनविण्यात यावा, दोन्ही गावांपासून मंदिरापर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी यासह इतरही मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

तीर्थक्षेत्र,यात्रा व पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा..

श्री सप्तशृंगी देवीच्या नाशिक जिल्ह्यातील वणीचा मोठागड (सासर) व जळगांव जिल्ह्यातील शिरागडचा लहानगड (माहेर) हे एकच स्वरूप असुन येथील मंदिरही अनादीकाळापासुन स्थापीत आहे.परंतु अजुनही शिरागडला तीर्थक्षेत्र, यात्रास्थळ व पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला नाही.याबाबतचे पत्र पर्यटनमंत्री ना.मंगल प्रभात लोढा यांचेकडेस पाठविले आहे.

Spread the love