भुसावळ प्रतिनिधी -राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यांचा मागील 20 दिवसांपासून संप सुरु आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अशा परिस्थिती भुसावळ अगारातील तीन वाहक व तीन चालक कामावर दाखल झाल्यामुळे 27 रोजी तीन बसेस सोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, बोदवड जाणार्या बसवर अज्ञातांनी दगडफेक करुन नुकसान करत बस थांबविल्याची घटना दु. 12 वाजेच्या सुमारास घडली.
कर्मचारी संपावर आक्रमक असल्यामुळे मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय कामावर परण्यास कर्मचार्यांनी नाकार दिला आहे. शासनाच्या लाभही कर्मचार्यांनी धुडकवले. त्यामुळे येथिल आगाराती तब्बल 14 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. येथिल आगारातील तीन वाहक व तीन चालक 26 रोजीच कामावर दाखल झाले होते. त्यामुळे 27 रोजी येथिल बस स्थानकातून बोदवड, यावल व जळगाव अशा तीन बसेसे सोडण्यात आल्या होत्या.
एस.टी. कर्मचार्यांचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठीच्या आंदोलनात काही कर्मचार्यांनी सेवते दाखल झाल्यामुळे तीन बसेस सोडण्यात आल्या. त्यापैकी बोदवडकडे जाणार्या बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याने ती फेरी रद्द करण्यात आली.











