एसटी रस्त्यावर धावली, पण गदारोळांची मालिका; तीन बसवर दगडफेक

0
50

अहमदनगर -सरकारने पगारवाढ जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे.

शेवगाव बस आगारातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला. मात्र आज शेवगाव आगाराच्या तीन बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक करण्यात आली असून या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेवगावकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या बसवर (एमएच ४० वाय ५४२८) अज्ञात इसमाने तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली. श्रीरामपुरकडे जाणाऱ्या बसवर (एमएच ४० एन ८८९५) सौंदळा (ता. नेवासा) येथे, तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एमएम ४० एम ८७५२ या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे.

यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगितले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. मात्र, शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता.

Spread the love