प्रदेश स्तरावरील भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा.यावल तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ.

0
42

प्रवीण मेघे

यावल ( प्रतिनीधी ) तालुक्यातील आदिवासी समाजातील प्रदेश स्तरावरील एका महिला पदाधिकाऱ्यांने नुकताच भाजपला राम राम ठोकल्याने यावल तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे यानंतर जिल्ह्यातील एक आमदार सुद्धा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संपूर्ण भुसावळ परिसरात बोलले जात आहे.

यावल तालुका भारतीय जनता पार्टी मध्ये काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तसेच पक्षाचे काम काज करताना विश्वासात घेतले जात नसल्याच्या कारणावरून भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्यांने राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे,तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे ध्येय,उद्दिष्ट जनतेपर्यंत पोचविण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावरून प्रसिद्ध करणेकामी पदाधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे सुद्धा बोलले जात आहे.

Spread the love