राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जळगाव शहरातील खेळाडूंना घवघवीत यश

0
48

जळगाव -महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे दि. २६ ते २९ डिसेंबर दरम्यान सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद ज्युनियर गटातील ३३व्या मुले व १७व्या मुलींच्या स्पर्धेसाठी जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पदके पटकावली.६० ते ६३ किलो वजनगटात अलिशा शेखने सुवर्ण पदक, ४८ ते ५० किलो वजनगटात सेजल पाटीलने रौप्य पदक, ५० ते ५२ किलो वजनगटात गार्गी पाटीलने कांस्य पदक, ७० ते ७५ किलो वजनगटात देवाशीष चांगरेने कांस्य पदक पटकावले व ४४ ते ४६ किलो वजनगटात साक्षी मोरे चतुर्थस्थानी राहिली.

प्रशिक्षक म्हणून निलेश बाविस्कर, विशाल सोनवणे व व्यवस्थापक म्हणून टहेमटन जलगाववाला यांनी काम पाहिले आहे. खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मा. मिलिंद दिक्षीत, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व जळगाव शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष डॉ. अमोल पाटील, सहसचिव नयन राणे, खजिनदार रोहिदास पाटील, रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी, डॉ. सारिका वाणी, सुरज नेमाडे, राकेश पाटील, पियुष भोसले, राकेश मु. पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले व शारदा पाटिल यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love