महाराष्ट्र – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून (BJP) जय्यत तयारी केली जात आहे. ४८ खासदार देणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यावर भाजपकडून विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे.
भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच संदर्भाने क्लस्टर बैठका घेत आहेत.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्र राज्यातील खासदारांची आज (दि. ८ ऑगस्ट) बैठक पार पडणार आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोदींच्या या क्लस्टर बैठका सुरू आहेत. आज सायंकाळी सहा वाजता या बैठकीचे आयोजन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्रातील सर्व खासदार राजधानी दिल्लीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्लस्टर बैठका होत आहे. एनडीए मधील महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील एकूण 48 खासदारांची एकत्रितपणे बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी मोदीयांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी मंत्री राजनाथ सिंह यांची या बैठकीसाठी उपस्थिती राहणार आहे.