राज्यात सध्या नवीन निर्बंध लावले जाणार ?राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचं सांगत त्यांनी राज्यात नवीन निर्बंध लावले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आली. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं.
परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरु, वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधणार, त्यांच्या चाचण्या करणार महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं पालन करावे असंही ते म्हणाले.
औरंगाबादमधील ‘त्या’ आदेशाचं मी समर्थन करत नाही;
औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण केल्याची खात्री करूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना महाविद्यालयात बसू द्या अन्यथा बसू देऊ नका असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या आदेशाचं मी समर्थन करत नाही. मात्र लसीकरण ऐच्छिक जरी असलं तरी ते गरजेचं आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचं आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलीगिकरण करत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग केली जात आहे. जे लोक दोन महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहे त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी (Genome sequencing) पाठवले जात असल्याच टोपे यांनी सांगितलं.
परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात असून कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.












