प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी अनेकदा निवेदन देण्यात आली मात्र सरकारने गंभीरतेने विचार केला नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघटना आक्रमक झाल्या आहे.दिनांक ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर राज्यातील हजारो पोलीस पाटील धडक देणार आहे.या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज्यअध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील यांनी केले आहे.
राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवाजी राव कोलते पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील परीश्रम घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांनी संपुर्ण राज्यभर दौरे करुन पोलीस पाटीलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र संपुर्ण राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून दरमहा किमान २१ हजार रुपये मिळावे,निवृत्तीचे वय ६० वर्षा वरून ६५ वर्षांपर्यंत करण्यात यावे,निवृत्तीनंतर किमान २५ लाख रुपये ठोस रक्कम मिळावी, ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे,नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागातील पद भरती करताना पोलीस पाटलांना प्रत्येकी पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा,शासनातर्फे पोलीस पाटलांचा ५० लाख रुपयाचा विमा उतरण्यात यावा आणि त्यांचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे, शासनाकडून पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम मिळावा तसेच कार्यरत पोलीस पाटील मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस पाटील म्हणून अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे,प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये मानधनासोबतच मिळावेत,पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटलांना त्यांच्या निवृत्ती काळापर्यंत कायम ठेवण्यात यावे,गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये एखादा पोलीस पाटील मरण पावल्यास त्या पोलीस पाटलास कुटुंबीयांना नोकरी आणि ५० लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे अशा महत्वपूर्ण मागण्या घेऊन राज्यातील पोलीस पाटील अधिवेशनावर धडक देणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघटना राज्य अध्यक्ष शिवाजी राव कोलते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष बळवंत राव काळे पाटील,कार्यकारी अध्यक्ष , राज्य उपाध्यक्ष राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील, राज्य सहसचिव गोरखनाथ टेमकर पाटील महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्रमुख,नागपूर विभाग अध्यक्ष विजय घाडगे पाटील, नागपूर जिल्हा अध्यक्ष रितेश दुरूगकर पाटील,संस्थापक सदस्य,
दिपक चौधरी. महिला जिल्हा संघटक जळगाव सौ वैशाली प्रमोद पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष, भंडारा जिल्हाध्यक्ष,यवतमाळ जिल्हाध्यक्ष , वाशिम जिल्हा,वर्धा जिल्हा अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हाध्यक्ष,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष, मराठवाडा विभागीय सचिव, मराठवाडा विभाग अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमरावती विभागीय अध्यक्ष तसेच सर्व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.
पोलीस पाटील पद हे गावातील महसूल आणि गृह विभागाचा महत्त्वाचा कणा मानला जातो. राज्यातील सर्व पोलीस पाटील गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्व माहिती शासनाला पुरवणारा एक दुवा म्हणून काम करत आहे.असे असतांना त्यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे सरकार गंभीरतेने बघायला तयार नाही.त्यामुळे आम्हाला मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही . जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त पोलीस पाटील यांनी मोर्चाला पाठिंबा द्यावा असे आवाहन संस्थापक सदस्य,दिपक चौधरी.व महिला जिल्हा संघटक पोलीस पाटील गाव कामगार संघटना सौ वैशाली प्रमोद पाटील यांनी केले आहे.












