महात्मा रावण दहन कृ्प्रथा बंद करा जय रावण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची मागणी..

0
41

हेमकांत गायकवाड

चोपडा -जय रावण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने चोपडा तहसीलदार याना पत्रकारान्वे निवेदन देण्यात आले…महात्मा रावण हे अत्यंत समृध्द संस्कृतीला वैभवशाली वारसाचा दैदिष्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण तज्ञ नितीतज्ञ, विवेकवादी उत्कृष्ठ रचनाकार, समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उदगाता न्यायप्रिय राजा असा अनेक गुणांचा अविष्कार करणारा महात्मा राजा होता. अशा महात्मा राजा रावण इथल्या षडयंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही.वास्तविक राजा रावणासारखा योधा झाला नाही राजा रावण आदिमसंस्कृतीचे श्रध्दास्थान आहे. परंतु आदिवासींचा या समताधिष्ठीत समाज व्यवस्थेच्या उद्गाला असलेला न्याय प्रिय राजा रावणाला जाळण्याची कृर प्रथा व परंपरा जाणिव पुरवक निर्माण करण्यात आली त्यामुळे देशातील आदिवासी समाजासह जागृत झालेला जणतेचा भावणा दुखवल्या जातात शिवाय या दहण प्रथेमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा -हास होत आहे.देशात आणि राज्यात अनेक कालमाहा वाईटप्रथा बंद करण्यात आल्या सतेची चाल या पुर्वीच बंद झाली असून महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात अंधश्रध्दा निर्मुलन कायदा देखील अस्तीत्वात आला आहे. यादिवशी राजा रावण दहणा ऐवजी बाईट प्रथा,परंपरा,जातीयता व अनियतीचे दहण करण्यात यावे. रावण दहण करण्याचा कोणी प्रयत्न केला त्यांची जनजागृती करावी व अशा आयोजकांना रावण दहणाची परवानगी देवू नये मात्र तरीही प्रथेच्या नावा खाली कोणी जर असा प्रकार केल्यास आदिवासी समाजाच्या तीव्र भावणा दुखावल्या जातात त्यामुळे जी मंडळे रावण दहण करतील अशा लोकांविरुध्द भारतीय दंडसंहिता १८६० अंर्तगत १५३,१५३ (अ), २९५ (अ), २९८ मुंबई पोलिस अँक्ट १३१,१३४,१३५ नूसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ही अनिष्ठ प्रथा त्वरीत बंद करण्यात यावी ही विनंती.रावण दहन ही क्रुप्रथा बंद व्हावी यासाठी जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य संघटनेकडून मागणी करण्यात आली.अमोल पारधी (संस्थापक अध्यक्ष),अजय पारधी(राज्य सचिव),विक्की पारधी(राज्य कार्याध्यक्ष),अक्षय पारधी(राज्य युवा अध्यक्ष),रेवसिंग पावरा(सदस्य),किरण पारधी(सदस्य),महेश पारधी,विजय पारधी,सागर पारधी,योगेश पारधी,राहुल माळी,मनोज पावरा,योगेश पारधी यावेळी जय रावण प्रतिष्ठान महा, राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love