सुनसगाव – :ता भुसावळ वार्ताहर – येथील के टी वेअर बंधाऱ्यात पाणबुडी पांथ्यावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह तरंगताना दि.१४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास मासेमारी साठी आलेल्याला दिसला असता त्याने माजी पोलीस पाटील प्रकाश मालचे व पत्रकार जितेंद्र काटे यांना माहिती दिली असता प्रकाश मालचे व जितेंद्र काटे यांनी नशिराबाद हद्दीतील घटना असल्याने नशिराबाद पोलीसात प्रकाश मालचे यांनी खबर दिली असता पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे व पोहेकाॅ शिवदास चौधरी , गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले.मयताच्या अंगावर लाल रंगाचा बनियन व लाल रंगाची अंडरपॅन्ट आहे तसेच गळ्यात धागा आहे .सदरची घटना ही तीन चार दिवसांपूर्वी घडली असावी अंदाज व्यक्त करण्यात येत असून पाण्यात मृतदेह सडल्याने दुर्गंधी पसरली होती तसेच मृतदेह खोल पाण्यात तरंगत असल्याने ईश्वर मालचे यांनी मृतदेहाला दोराने बांधून बाहेर काढले .या बाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यू क्रं १८ / २०२३ नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.