बुद्ध व बाबासाहेब यांचे पुतळे काढणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी :- जयसिंग वाघ

0
49

जळगाव : – सामान्य रुग्णालय जळगाव समोरील जुन्या बौद्ध वसाहतीत गेल्या ४० – ४५ वर्षां पासून असलेल्या भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांचे पुतळे आज अचानकपने काढून टाकले गेले , मात्र जनतेने तीव्र आंदोलन केल्या नंतर पुनः विधिवत बसविन्यात आले , असे जरी असले तरी सदर पुतळे काढलेच का ? हा प्रश्न अनुत्तरित राहतो , तेंव्हा ज्यांनी या बाबत आदेश दिले असतील तय अधिकारी विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी केली .                     सकाळी सकाळी वाघ यांनी सदर घटना स्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली , उपस्थित पोलीस अधिकारी व जनता यांच्याशी संवाद साधुन त्यांनी परिस्थिति समजून घेतली , कायदा व सुव्यवस्था कायम राखण्या करीता सदर पुतळे पुनः बसविले गेले , त्या नंतर बाबासाहेब आम्बेडकर व भगवान बुद्ध यांची विधिवत पूजा करण्यात आली व सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली , सदर प्रकरण तुर्त जरी मिटले असले तरी भविष्यात पुनः निर्माण होईल तेंव्हा जनतेने सतर्क राहून हा प्रकार हाणून पाड़ावा व आजच्या दोषी अदिकारी लोकां विरुद्ध कारवाई करण्यात यावी या करीता जनांदोलन उभे करावे असेही वाघ यांनी सांगितले.

Spread the love