जळगाव – बेलव्हाय बस गावात आणण्याची विद्यार्थींची मागणी !

0
51

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव बस डेपो येथून व्हाया सुनसगाव मार्गे येणारी जळगाव – बेलव्हाय ही बस गेल्या दोन – तीन दिवसांपासून जळगावहून येताना चौफुली वरुन सरळ बेलव्हाळ येथे जाते. त्यामुळे प्रवाशांना चौफुली वरुन पायी गावात यावे लागते. तसेच एस टी बेलव्हाळ येथे गेली आहे किंवा नाही कोणालाही कळत नाही. आणि अचानक एस टी आल्यावर विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. तर काही वेळा विद्यार्थ्यांना बेलव्हाळ चौफुलीवर जावे लागते. त्यामुळे बऱ्याचदा ग्रामस्थ व चालक वाहक यांच्या मध्ये तू तू मैं मैं होते त्यामुळे जळगाव – बेलव्हाय बस येताना व जाताना सुनसगावात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

Spread the love