सोनी लिव्ह वाहिनी विद्यार्थ्यांसाठी क्विझ चॅलेंज घेऊन आली आहे. ‘क्विझर ऑफ द इअर’ असे या स्पर्धेचे नाव आहे. यामध्ये 9 वी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढावे, त्यांच्यात जिज्ञासूवृत्ती निर्माण व्हावी, यासाठी ‘क्विझर ऑफ द इअर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुलांना त्यांची क्षमता आणि ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी हे व्यासपीठ आहे. यासाठी सोनी लिव्ह अॅपवर नोंदणी करत आणि दररोज सात प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. अंतिम विजेत्यांना एक कोटी रुपयांची स्कॉरलशीप आणि ‘क्विझर ऑफ द इअर’चा प्रतिष्ठत किताब देण्यात येणार आहे. स्पर्धेचे नेतृत्व देशातील ग्रॅण्ड क्विझमास्टर सिद्धार्थ बासू यांनी केले असून निर्मिती अनिता कौल बासू आणि ट्री ऑफ नॉलेज डिजिटल (डिजिटोक) यांच्या सहयोगाने करण्यात आली आहे.











