प्रतिनिधी- जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हे पानाचे येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित श्रीराम प्राथमिक विद्यामंदिराचे ५७ व राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाच्या ४७ अशा १०४ विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची शैक्षणिक सहल शनिवार दि. ११ रोजी छत्रपती संभाजी नगर, सिद्धार्थ गार्डन,बीबी का मकबरा, प्राणीसंग्रहालय, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर येथे भेट देऊन पार पडली. संस्थेचे संचालक घनश्याम बडगुजर यांच्या हस्ते दोन बसेसचे पुजन करून सहलीला सुरूवात झाली. श्रीराम प्राथमिक विद्यामंदिराचे ५७ विद्यार्थ्यांची एक बस व राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाच्या ४७ विद्यार्थ्यांची एक बस अशा १०४ विद्यार्थ्यांना दोन बसेसने प्रवासाला सुरुवात झाली.
छत्रपती संभाजी नगर येथील ऐतिहासिक वास्तू- दख्खन का ताजमहल समजल्या जाणाऱ्या बीबी का मकबरा, सिद्धार्थ गार्डन मधील प्राणीसंग्रहालयामध्ये विविध प्रकारच्या प्राणी, पक्षी, सर्प तसेच मसाल्यामधील विविध रंगबिरंगी मासे बघून विद्यार्थी आनंदाने भारावले विविध प्रकारचे सर्प पाहून, अजगर पाहून तसेच, मगर, कासवे, सायाळ, इमु पक्षी, हरण, काळवीट, माकड, निलगाय, कोल्हा, बिबट्या, पट्टेदार वाघ, पांढरा पट्टेदार वाघ ने दिलेले दर्शन त्यामुळे विद्यार्थी भारावून गेले . त्यानंतर जागतिक वारसा असलेले वेरूळच्या लेणी यामध्ये वीस रुपयाच्या नोटवर असलेले शिल्पचित्र, तसेच वेरूळ लेणी मधील विविध शिल्पकला विद्यार्थ्यांनी पाहिल्या व शेवटी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर येथील घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन घेऊन सुखरूप परत आले. सहल प्रमुख म्हणून डी डी काळे यांनी काम पाहिले.