विद्यार्थ्यांनी स्वतःला आव्हान द्यायला शिकले पाहिजे : डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन 

0
50

आर. डी. माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे केले होते आयोजन

भुसावळ – येथून जवळच असलेल्या कुऱ्हे पानाचे येथील आर डी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी दिवसेंदिवस शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत असून शिकणे आणि शिकवणे यातील अंतर कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनातून शिकले पाहिजे. यासाठी त्यांना शिक्षकांनी प्रेरणा देण्याची गरज आहे. आणि विद्यार्थ्यांनी स्वतःला विविध आव्हान देऊन शिकले पाहिजे. तेव्हाच विद्यार्थी स्वयंअध्ययनातून आत्मनिर्भर होऊ शकेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त तथा बालभारती मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

कुऱ्हे पानाचे येथील आर डी माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील ग्रंथपाल सुदर्शन बडगुजर यांनी विद्यार्थी गुणगौरव समारंभात आयोजित केला होता तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थाध्यक्ष एकनाथ बडगुजर, माजी जि प सदस्या शशिकला बडगुजर, मुख्याध्यापक आर. व्ही. गवळी, पर्यवेक्षक एस. डी. वाघ, राजश्री कोळी, महेंद्र काळे, उर्दू शाळेचे जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रिजवान खान आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात ग्रंथपाल सुदर्शन बडगुजर यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगितला. प्रत्येक वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांला बामणोद येथील प्रवीण गांधेले यांनी स्वलिखित इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक भेट देऊ केले होते. त्यानुसार इयत्ता पाचवी ते दहावीत प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व एज्युकेशन पुरवणी भेट म्हणून देण्यात आली.

महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. जगदीश पाटील यांना मराठमोळी टोपी परिधान करून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक आर. व्ही. गवळी यांनी सन्मान केला. तसेच जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त रिजवान खान व रा धों बडगुजर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महेंद्र वंजारी, आर एस बडगुजर यांचा सत्कार डॉ. जगदीश पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला.

डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणजे काय, तो कसा करावा, अभ्यास करण्याच्या विविध पद्धती, स्वयंअध्ययनातून शिकणे, पाठ्यपुस्तक अभ्यासणे अशा विविध बाबींविषयी सविस्तरपणे माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुदर्शन बडगुजर यांनी केले.

Spread the love