भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ – :तालुक्यातील सुनसगाव येथील सुदर्शन पेपर मील ला भिषण आग लागली असून आग आटोक्यात आणण्यासाठी भुसावळ व जळगाव येथून अग्निशामक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले आहे.
https://youtu.be/oNn94F2UPC0
आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे व तापमानाचा पारा वाढल्यामुळे असे आग लागण्याचे प्रकार बऱ्याचशा ठिकाणी घडत आहेत परंतु सुनसगाव येथील सुदर्शन पेपर मिल मध्ये आग कशी लागली कशी लागलीयाचे कारण अद्याप पावतो समजलेले नाही.