कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्लापूर गावानजीक राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा मार्ग पलटी होऊन 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजी मंडईत जात होते. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हुब्बळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भाजीपाल्याने भरलेली एक लोडिंग वाहन सवणूर येथून कुमटाकडे जात होती. या वाहनात 25 लोक प्रवास करत होते. मृतांची ओळख हावेरी जिल्ह्यातील सवणूर येथील राहणाऱ्यां म्हणून झाली आहे. सकाळी 3.30 वाजता रस्त्यावर धुके असल्याने या वाहनाचा अपघात झाला. घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत.
मृत व्यक्तींची माहिती:
फयाज जमखंडी – 45 वर्षे
वसीम मडगेरी – 35 वर्षे
इज्जाज मुळ्ला – 20 वर्षे
सदीक भास – 30 वर्षे
गुलाम हुशेन जवळी – 40 वर्षे
इम्तियाज मुळकेरी – 36 वर्षे
अल्पाज जाफर मडक्की – 25 वर्षे
झीलानी अब्दुल झखाती – 25 वर्षे
अस्लम बाबुली बेणी – 24 वर्षे
मी झोपलो होतो आणि अचानक..
हा अपघात पहाटे 3.30 वाजता झाला. ‘मी झोपलो होतो, आणि अचानक टायर फुटल्यासारखा आवाज आला, त्यानंतर हा अपघात झाला,’ असे त्यांनी सांगितले. ‘आम्ही सर्वजण प्रत्येक आठवड्यात बाजारात जात असतो.