सुधीर पाटील यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र संघटक सचिवपदी निवड.

0
49

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भटूआप्पा पुंडलिक नेरकर (कुसुंबा) यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली असून, श्री सुधीर सुकलाल पाटील यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याचा आणि समाजातील प्रभावी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. श्री सुधीर सुकलाल पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य न्याय व हक्कांसाठी सातत्याने झगडत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक आणि क्षेत्रात समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक कार्य यशस्वीपणे राबवण्यात आली आहेत.

नवीन जबाबदारी स्विकारल्यानंतर श्री सुधीर सुकलाल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की –

*”ही जबाबदारी मला मिळालेली सन्मानाची नव्हे, तर समाजाच्या विकासासाठी अधिक मेहनत करण्याची संधी आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार असून, समाजाच्या प्रत्येक घटकाच्या प्रगतीसाठी झटणार आहे.” भविष्यातील दिशा – ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी भक्कम भूमिका! राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र संघटक सचिव या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर, बी एम चौधरी यांनी सांगितले की –

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र केला जाईल. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी ठोस पावले उचलली जातील. समाजाच्या प्रत्येक स्तरावर ओबीसींना समान संधी मिळावी, यासाठी मी सातत्याने कार्यरत राहील असे सांगीतले.

Spread the love