सुनसगाव बेलव्हाळ रस्त्यावर असलेल्या फॅक्टरीत स्फोट : दोन कामगार जागीच ठार

0
14

भुसावळ( प्रतिनीधी) तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील एका फॅक्टरीत वेल्डींग करीत असतांना झालेल्या स्फोटामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मयतांमध्ये मध्यप्रदेशासह भुसावळातील मजुराचा समावेश आहे.

https://youtu.be/gWN8EqvfqDw

मयत व्यक्तींची नावे काशिनाथ सुरवाडे , खेमसिंग पटेल अशी आहेत .

सूत्रांची माहिती अशी कि , आज दुपारी साडेबारा आणि एक वाजेच्या सुमारास सुनसगाव रस्त्यावर दिया कॉपर मास्टर अलायन्स फॅक्टरी आहे. या फॅक्टरीतील भरलेल्या ऑईल टाकीला दोन मजुरांकडून शुक्रवार, 21 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वेल्डींगचे काम करीत असतांना अचानक स्पार्कींग होवून मोठा स्फोट झाला व या घटनेत वरील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाच्या आवाजाने परीसरात मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली .

Spread the love