प्रतिनिधी ( जितेंद्र काटे ) – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार असून या समितीच्या अध्यक्षपदी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीत उपाध्यक्ष रितेश सपकाळे , खजिनदार चंद्रकांत सपकाळे , सचिव विकास सपकाळे हे असून सदस्य म्हणून शांताराम बिऱ्हाडे , हरी कनकुटे , अमोल सपकाळे , अनिल प्रल्हाद सपकाळे ,अमर तायडे , महेंद्र सपकाळे ,सुशिल सपकाळे , गौरव सपकाळे , संतोष खरोटे , विश्र्वास खरोटे , भावेश सपकाळे , अमोल बाविस्कर , मुकेश सपकाळे , विनोद सपकाळे , लोकेश सपकाळे , विनोद सोनवणे , किरण तायडे अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या वर्षी ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजना माध्यमातून अनुसूचित जमातीच्या लोकांना फायदा व्हावा यासाठी बुध्द विहारासाठी वस्तू घेणार असल्याचे एकनाथ सपकाळे यांनी सांगितले आहे.












