सुनसगाव – नशिराबाद रस्त्यावरील पुलावरील खड्डे बुजविण्यास सुरवात!

0
31

सुनसगाव – येथून जवळच असलेल्या सुनसगाव – नशिराबाद रस्त्यावरील वाघुर नदीच्या पुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठे खड्डे पडले होते या बाबत जळगाव संदेश मध्ये दि. १३ मे रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती आणि बातमी मध्ये या पुलावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी केली होती. आता या ठिकाणी खड्डे बुजविण्यास सुरवात करण्यात आली आहे. खड्डे बुजताना डांबर व खडी चा वापर योग्य प्रमाणात करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

Spread the love