सुनसगाव शिवारात सर्पदंशाने बैलाचा मृत्यू !

0
38

सुनसगाव – सध्या पावसाचे वातावरण सुरू असून सरपटणारे प्राणी बाहेर निघू लागले असून विंचू, साप असे विषारी प्राणी दिसू लागले आहेत. येथील बाबूवाले पट्टी शेती शिवारात दिपक जनार्दन पाटील (श्रीहरी टेंट संचालक) हे आपल्या बैलजोडी ने कोळपणी करीत असताना बैल अचानक चक्कर येऊन पडला असता ताबडतोब पशुवैद्यकीय डाॅक्टरांना पाचारण करण्यात आले असता बैलाला सर्पदंश झाला असल्याचे सांगितले. बैलाची किंमत ४० हजार रुपये असल्याचे समजते.

सदरची घटना दि.१० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रत्येक शेतकरी व शेतमजूर यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे बोलले जात आहे.

Spread the love