सुनसगाव शिवारात विज पडल्याने बैलाचा मृत्यू.

0
39

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील व परिसरातील गावांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि सुनसगाव शिवारात शेतात राहणाऱ्या महेंद्रसिगं चव्हाण यांच्या बैलावर विज पडल्याने बैलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाल्याचे सांगितले जात आहे मात्र रात्री आठ वाजेच्या दरम्यान वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला आणि विज पुरवठा खंडित झाला असल्याने अजून पर्यंत कोणा कोणाचे नुकसान झाले हे समजू शकले नसले तरी सुनसगाव पोष्ट आॅफिस समोर निंबाची फांदी मोटरसायकल वर पडल्याने तीन मोटरसायकल चे नुकसान झाले आहे. लाईट गेलेली असल्याने बऱ्याच लोकांची माहिती समजू शकलेली नाही.

Spread the love