भुसावळ – येथील बेलव्हाळ रस्त्यावर असलेल्या कंपनीत सुरक्षा कर्मचारी म्हणून असलेले देवा पवार हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते आपल्या परिवारासह कंपनीच्या खोली मध्ये राहतात दि. १८ रोजी त्यांची लहान मुलगी परी उर्फ चुटकी देवा पवार ही कंपनीत पेरणी करण्यात आलेल्या मक्यात मकी चे कणीस घेण्यासाठी गेली असता सर्पदंश झाला त्या नंतर तीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी नेण्यात आले आणि तेथून नंतर सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना परी पवार ही ची प्राणज्योत मालवली. ती येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होती तसेच हुशार विद्यार्थ्यांनी होती. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार असून तिच्यावर दि २० रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.