प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री मनुदेवी मंदीर येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धानुका अँग्रो कडून चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोंभी, गोजोरा,बेलव्हाळ व सुनसगाव येथील असंख्य शेतकरी उपस्थित होते .यावेळी सोयाबीन, कपाशी, केळी व इतर खरीप आणि रब्बीचा हंगाम चांगल्या प्रकारे यावा यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी घनश्याम इंगळे (SME) विषय वस्तू तज्ञ, कपिल वडजे (ASM) आशिषकुमार प्राँडक्ट मँनेजर, राहुलकुमार किटकनाशक मँनेजर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहीत खडके (BDO), यशवंत ताडे, निंबाजी वसु (SO) यांनी सहकार्य केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीविषयक प्रश्न विचारले त्याला समाधान कारक उत्तरे देण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.