सुनसगावच्या मयुर भोळे यांची लेवा युथ फोरम बदलापूरच्या सदस्यपदी नियुक्ती !

0
46

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील मूळ रहिवाशी व ह.मु.बदलापूर (मुंबई) येथील मयुर सुभाष भोळे यांची लेवा युथ फोरम बदलापूर शहर सदस्यपदी नियुक्ती करुन सन्मान करण्यात आला आहे. डोंबिवली येथे नुकताच लेवा समाज कौटुंबिक भव्य दिव्य सामाजिक सांस्कृतिक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी लेवा युथ फोरम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री हर्षल भंगाळे व लेवा सखी कला मंच मुंबई परीसर अध्यक्षा सौ निशाताई अत्तरदे यांच्या हस्ते मयुर भोळे यांचा सत्कार करण्यात आला. ते सुनसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोळे व शैला भोळे यांचे चिरंजीव आहेत.या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Spread the love