सुनसगावात एकाला ऑनलाईन ५० हजारांचा गंडा !

0
2

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथील एकाला अज्ञात नंबर वरुन फोन आला व फोन वर मध्येच दुसरा फोन आला असता पहिला फोन बंद करताच बँकेच्या खात्यातून ५० हजार रुपये डिबीट झाल्याचा मेसेज आल्याने संबंधिताने पोलीसात धाव घेतली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की , येथील रहिवासी हभप लिलाधर महाराज उर्फ लिलाधर जनार्दन पाटील खजिनदार श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट सुनसगाव हे दि. ११ मार्च रोजी दुपारी १२:५० वाजेच्या सुमारास ९१७९८०८४८१६० या नंबरवर बोलत होते.मात्र मध्येच गावातील एकाचा फोन आला असता पहिला फोन बंद केला व दुसऱ्या आलेल्या फोन वर बोलत असताना १२:५६ ला युनियन बँक ऑफ इंडिया नशिराबाद शाखेच्या बँकेत असलेल्या खात्यातून रुपये ५० हजार डिबीट झाल्याचा मेसेज आला.त्यामुळे लिलाधर पाटील यांनी नशिराबाद येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेत धाव घेतली व व्यवस्थापक यांना माहिती दिली असता बँकेचे व्यवस्थापक यांनी नशिराबाद पोलीसांशी संपर्क साधला तसेच लिलाधर पाटील यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दिली तसेच जळगाव सायबर क्राईम ला ऑनलाईन तक्रार दाखल केली असून नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार घडत आहेत अनेक वेळा पोलीस सुचनाही देतात मात्र अजूनही ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार घडत आहेत त्याचाच प्रकार येथे घडला आहे . नशिराबाद पोलीसांनी सुध्दा सतर्क राहण्याचे आवाहन केले असून परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असे हभप लिलाधर पाटील यांनी दै.देशदूत शी बोलताना सांगितले आहे.

Spread the love