भुसावळ – महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेचा शुभारंभ येथे करण्यात आला असून माजी पंचायत समिती सभापती मनिषा पाटील , भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील , यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
शासनाच्या दररोज प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार योजना राबविण्याचा संकल्प या अभियानात करण्यात आला आहे
विशेष म्हणजे कमीतकमी कागदपत्रे व अर्ज यांच्या माध्यमातून योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे असा आग्रह शासनाचा आहे.
या योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच स्वयंसेवक प्रथमच नागरीकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन योजनांची माहिती देणार आहे. शासन आपल्या दारी या अभियानाने एकाच छताखाली सर्व प्रकारच्या योजनांची माहिती मिळणार आहे .या योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पोलीस कवायत मैदान , जळगाव येथे दि २७ जून रोजी दुपारी ४ वाजता होणार असून या बाबत पत्रक दिले जात आहे.येथील तलाठी कार्यालया समोर भुसावळ पंचायत समितीच्या माजी सभापती मनिषा पाटील , भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील ,विकासोचे चेअरमन सुदाम भोळे , ग्रामसेविका प्रतिभा तायडे , तलाठी जयश्री पाटील , उल्हास भोळे , पत्रकार जितेंद्र काटे , सामाजिक कार्यकर्ते आनंदा सपकाळे , बाळू सुर्यवंशी , सुरेश निकम , पंकज पाटील तसेच बेलव्हाळ येथील नागरीक उपस्थित होते.