भुसावळ – येथील ग्रामपंचायत कार्यालया जवळ गटार तुंबल्याने गटारीचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे या प्रभागात अनुसूचित जाती च्या जागेवर निवडून आलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य एकनाथ फुलसिंग सपकाळे यांनी स्वता व्यक्तिशः लक्ष देऊन आपल्या हाताने गटार काढून पाण्याचा प्रवाह मोकळा केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ गावातील गृपवर सामाजिक कार्यकर्ते हभप लिलाधर पाटील यांनी टाकले होते त्यामुळे सदस्य असावा तर असा! अशी चर्चा गावात सुरू आहे. येथून जवळच असलेल्या गोजोरे गावात अशीच विकासाची कामे सरपंच पती स्व खर्चाने करीत आहेत. एकनाथ सपकाळे यांनी स्वता कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे इतर सदस्य ही आपापल्या प्रभागात सुरवात करतील काय? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.