प्रतिनिधी- जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे दर शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत बाजार भरतो मात्र त्याच वेळी गुरेढोरे चारण्यासाठी नेले जातात तसेच सध्या सुनसगाव बायपास रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे काही वाहनधारक आपली वाहने गावातून घालतात मात्र ग्रामपंचायत कार्यालया समोर मध्यभागी चौकात भाजीपाला विक्रेते दोन ओळीत बसलेले असतात त्यामुळे कार व ट्रँक्टर सारखे वाहन चालवताना कसरत करावी लागते तर कधी गुराढोरांचा व वाहनाचा धक्का लगतो त्यामुळे बाचाबाची होऊन वाद वाढतो म्हणून किमान शुक्रवारी बसस्थानक चौकात ग्रामपंचायतीने लक्ष घालून दुकाने लावू देऊ नये जेणे करुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारक व गुराढोरांना रस्ता मोकळा राहील याची दखल ग्रामपंचायत पदाधिकारी , पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील सुज्ञ व समजदार नागरीकांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.