प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगावातील अनेक कामे थांबलेली होती मात्र आता विकास कामांना सुरवात होताना दिसत असल्याने ग्रामस्थांचे समाधान होत आहे. सध्या गावात गटारी वरील तुटलेले ढापे नविन करण्याचे काम सुरु आहे. तसेच गटारी साफसफाई सुरु असून नुकतेच गावात ज्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते अशा ठिकाणी लाईट लावण्यात आले आहेत.त्यामुळे कासव गतीने का होईना गावाची विकासाकडे वाटचाल सुरु झाली आहे.आता शाळा सुरु झाली आहे त्यामुळे मराठी शाळेच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे आणि त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे लक्ष बाहेर जाते त्यामुळे या विकास कामांमध्ये शाळेच्या भिंतीला पडलेले भगदाड केव्हा बुजणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.