सुनसगाव आशासेविका सुनिता काटे यांचा महिला दिनी सन्मान

0
29

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील नियोजन भवन येथे पार पडलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात सुनसगाव येथील आशासेविका सुनिता जितेंद्र काटे यांचा सन्मान चिन्ह देऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय ते स्वातंत्र्य चौक अशी शोभा यात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेत दिंडी ,पालखी ,बंजारा गीत ,लेझीम पथक व डि जे च्या तालात सत्काराथ्यी महिलांनी ठेका धरला.

या कार्यक्रमाचे आयोजन महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद जळगाव यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

संपूर्ण जिल्हातील प्रत्येक तालुक्यातून पर्यवेक्षिका ,अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल या जागतिक महिला दिनी सन्मानीत करण्यात आले.

सुनिता जितेंद्र काटे ह्या वराडसिम प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सुनसगाव उपकेंद्रात आशा सेविका म्हणून २०१८ पासून कार्यरत आहेत.

तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.तडवी तसेच वराडसिम आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी तसेच सुनसगाव उपकेंद्राचे सीएचओ डॉ. रुपेश पाटील , आरोग्यसेविका विजया पाटील ,आरोग्यसेवक संजय कोळी ,गटप्रवर्तक अनिता पवार , योगीता बारी यांचे मार्गदर्शन लाभले व सहकारी आशासेविका व गावातील सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने माझा सन्मान झाला असे आशासेविका सुनिता काटे यांनी सांगितले.

Spread the love