सुनसगाव आयुष्यमान उपकेंद्रात वृक्षारोपण !

0
42

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ -: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम अंतर्गत सुनसगाव येथील आयुष्यमान उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपकेंद्राचे सीएचओ डाँ. रुपेश पाटील, आरोग्यसेवक संजय कोळी, आशासेविका ज्योती पाटील, सुनिता काटे तसेच समन्वयक सुवर्णा सपकाळे व पत्रकार जितेंद्र काटे, गावातील श्री भोळे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी तालुका वैदकिय अधिकारी डॉ तडवी व वराडसिम पीएचसी चे वैदकिय अधिकारी डॉ फालक मॅडम व डाँ सौनी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान उपकेंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावणार असल्याचा संकल्प उपकेंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी केला आहे.

Spread the love